Site icon सक्रिय न्यूज

बहुजन विकास परिषदेचा बजरंग सोनवणे यांना जाहीर पाठिंबा….!

Oplus_0

केज दि.७ – लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे वातावरण तापायला सुरू झालेले आहे. एकीकडे उन्हाचा तडाका तर दुसरीकडे प्रचाराचा धडाका अशी काहीशी अवस्था सध्या दिसून येत आहे. लोकसभेच्या मैदानात उतरलेले उमेदवार प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर देत असून काही संघटना आणि कार्यकर्त्यांना आपल्या गटात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि याचाच एक भाग म्हणून बहुजन विकास परिषदेने आज बीड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना एकमुखी पाठिंबा दिला असल्याची माहिती बहुजन रयत परिषदेचे रमेश गालफाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

                  बीड लोकसभा मतदार संघांमध्ये सध्या तरी भाजपाच्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे. शहर, खेडे, वस्त्यावर उमेदवार पोहोचत असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कसे जाता येईल यासाठी जीवाचे रान करत आहेत. यातच काही संघटना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी उमेदवार प्रयत्न करत असून बजरंग सोनवणे यांनी रमेश गाल फाडे यांची भेट घेतली. त्यामुळे बहुजन विकास परिषदेचे रमेश गालफाडे यांनी केज शहरात रविवारी पत्रकार परिषद घेत बहुजन विकास परिषदेचा महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना जाहीर पाठिंबा दिल्याची माहिती दिली.
         दरम्यान पत्रकार परिषदेच्या अगोदर कार्यकर्त्यांची ही बैठक झाली. यावेळी तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील बहुजन विकास परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर बैठकीसाठी हजर होते. बहुजन विकास परिषदेने बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिल्याने याचा चांगलाच फायदा बजरंग सोनवणे यांना होणार असल्याचे दिसून येत आहे.
शेअर करा
Exit mobile version