Site icon सक्रिय न्यूज

३२ वर्षीय तरुणाचे हृदयविकाराने निधन…..!

केज दि.१२ – तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी तथा केज शहरातील उमरी रोडवर वास्तव्यास असणाऱ्या निलेश अनिल काळे या 32 वर्षीय तरुणाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
                    शहरातील उमरी रोडवर स्थायिक असलेल्या अनिल काळे यांचा निलेश हा मुलगा पुणे येथे एका कंपनीमध्ये काम करत होता. मात्र रमजान ईद निमित्त सुट्टी असल्यामुळे तो मित्रांसमवेत देवदर्शन करत असताना चाकण या ठिकाणी सकाळी आठच्या दरम्यान त्याच्या छातीमध्ये दुखू लागल्याने त्याला तेथीलच एका स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान निलेशचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतिशय नम्र आणि सुस्वभावी असलेल्या निलेश चे अकाली निधन झाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा मोठा परिवार आहे.
                   दरम्यान निलेश काळे यांच्यावर दिनांक १३ रोजी सकाळी आठ वाजता केज शहरातील क्रांतीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शेअर करा
Exit mobile version