केज दि.१९ – सहा. पोलीस अधीक्षक श्री. कमलेश मीना, उपविभाग केज यांचे पथकाचे गोवंश जातीचे जनावरे कत्तलखाण्यात जाणाऱ्या वाहनावर कारवाई ६,१७,०००/- रू. किमतीचे गोवंश जातीचे जनावरासह वाहतुकीस वापरातील आयशरसह एकुण १६,१७,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन 07 आरोपीचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
गुरुवार दिनांक १८ एप्रिल रोजी सहा. पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग केज यांना मिळालेल्या माहितीनुसार, एक आयशर पासींग क्रमांक एम.एच.०४ जी.सी.८५२३ यामध्ये गोवंश जातीचे जनावरे भरुन ती कत्तलीसाठी बेकायदेशिर रित्या साळेगावकडुन केज कडे अवैद्य वाहतुक करित आहे. अशी माहिती मिळाल्यावरुन सहा. पोलीस अधीक्षक, कमलेश मीना यांनी पथकातील दिलीप गित्ते, पोलीस नाईक विकास चोपने, अनिल मंदे, चालक पोलीस हवालदार माने यांना सदर वाहन ताब्यात घेवुन कायदेशिर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने चिंचोळीमाळी फाटा येथे रात्री ६.३० वाजण्याचे सुमारास वर नमुद वाहन ताब्यात घेतले. वाहनाचे चालक यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अमजद सत्तार तांबोली रा. कोकचपिर ता. केज जि.बीड असे सांगीतले. तसचे गाडीतील लोकांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सलमान अमजद पठाण, रा. टिपु सुलतान चौक, केज ता. केज जि.बीड (क्लीनर), बाबासाहेब पंढरीनाथ दळवी, रा. दळवी वस्ती केज, सदरच्या वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये ४ गाई, ८ कालवड, ८ गोरे, ३ हले, २ जर्सी गाईचे वासरं असे एकुण ६,१७,०००/- रूपयाचे जनावरे व १०००००/- रुपये किंमतीचे आयशर जप्त करुन असा एकुण १६,१७,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
त्यानुसार अमजद सत्तार तांबोली रा. कोकचपिर ता. केज जि.बीड (चालक), सलमान अमजद पठाण, रा. टिपु सुलतान चौक, केज ता. केज जि.बीड (क्लीनर), बाबासाहेब पंढरीनाथ दळवी, रा.दळवी वस्ती केज (व्यापारी), लायक ईस्माईल खुरेशी, (व्यापारी), बीलाल अजीब खुरेशी, साबेर सत्तार खुरेशी, अ.क्र. ४ ते ५ रा अंबाजोगाई जि. बीड, अजीम नशीब पठाण, रा. रोजामोहल्ला ता. केज जि.बीड, यांचेविरुध्द वरील वर्णनाचे व किंमतीचे गोवंश जातीचे जनावरे क्रुरतेने निर्दयीपणे क्षमतेपेक्षा जास्त भरुन आयशर टैम्पोमध्ये भरुन त्यांची कत्तल करण्यासाठी घेवुन जात असतांना मिळुन आल्याने वर नमुद आरोपीविरुध्द पोलीस नाईक दिलीप गित्ते यांचे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे केज येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई नंदकुमार ठाकुर, पोलीस अधीक्षक, बीड, श्रीमती चेतना एस. तिडके, अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली कमलेश मीना, सहा. पोलीस अधीक्षक, उपविभाग केज यांचे आदेशाने पोलीस नाईक दिलीप गित्ते, अनिल मंदे, विकास चोपने, अशफाक ईनामदार, पोलीस हवालदार मल्लीकार्जुन माने यांचे पथकाने केली आहे.