Site icon सक्रिय न्यूज

युसुफ वडगाव सर्कल मधील आजी माजी पदाधिकाऱ्यांचा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश…..!

केज दि.२७ –  तालुक्यातील युसुफ वडगाव जिल्हा परिषद सर्कल मधील धनेगाव, बावची, आनेगाव, नायगाव या गावांमधील अनेक आजी माजी सरपंच, सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व तालुकाध्यक्ष विष्णुभाऊ चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश केला असल्याने धनंजय मुंडे यांनी ग्राउंड लेवलकडे लक्ष दिल्याचे दिसत आहे..
           यावेळी माजी सरपंच बाळासाहेब नांदे, सुहास गुजर, माजी चेअरमन शंकरराव इंगळे,बाळासाहेब गुजर,शिवप्रसाद गुजर,मन्मथ गुजर,विशाल खोडसे, परीक्षित खोडसे, पंकज खोडसे, सचिन शिंपले, राजन पोटभरे, विजय वाघमारे, दयानंद गुजर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तर चिंचोली माळी येथील मालोजी गलांडे यांनी देखील पक्षप्रवेश केला आहे.
          दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे बजरंग सोनवणे यांना मोठा धक्का समजल्या जात असून अनेक आजी माजी सरपंच व कार्यकर्ते येणाऱ्या काही दिवसात पक्षप्रवेश करणार असल्याचे बोलल्या जात आहे.
शेअर करा
Exit mobile version