Site icon सक्रिय न्यूज

कानडीमाळी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…..!

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी....!

केज दि.२८ – तालुक्यातील कानडी माळी येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ध्वजारोहण करण्यात आले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.

             कानडी माळी येथे दिनांक २७ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले तसेच आयएमएचे तालुकाध्यक्ष तथा बालरोग तज्ञ डॉ. दिनकर राऊत हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच अशोक राऊत यांची उपस्थिती होती. तसेच रिपाईचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे, पत्रकार डी.डी. बनसोडे, रिपाईचे सचिव दिलीप बनसोडे, उपसरपंच बालासाहेब राऊत यांचीही सदरील कार्यक्रमाला उपस्थिती होती.
           कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी सैनिक लक्ष्मण मस्के, सदाशिव मस्के, संतराम मस्के, पांडुरंग राऊत ध्वजारोहण करण्यात आले आणि बौद्ध वंदना घेतल्यानंतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी डॉ. आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श घ्यायचा असेल तर शिक्षणावर भर दिला पाहिजे असे सांगितले. तर डॉ. राऊत यांनी वेगवेगळे उदाहरणे देऊन किती प्रतिकूल परिस्थिती मधून बाबासाहेबांनी समाजासाठी आणि संपूर्ण देशासाठी मोलाचे योगदान दिले याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
                दरम्यान, सदरील कार्यक्रमासाठी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुंदर खाडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर गरुड यांच्यसह इतर तरुणांनी परिश्रम घेतले.
शेअर करा
Exit mobile version