Site icon सक्रिय न्यूज

एक शिक्षक परंतु तंत्रस्नेही…..!

Oplus_0

एक शिक्षक परंतु तंत्रस्नेही म्हणायला ही कांहीं हरकत नाही. शिक्षकी पेशा स्वीकारण्या पूर्वीपासून संगणकाची उत्तम अशी माहिती असलेले एक तंत्रणेही शिक्षक म्हणजेच संजय गोरे होय. त्यांच्या पत्नी सौ. सुप्रिया गोरे यांच्या प्रचंड अशा हुशारी व्यक्तिमत्वाच्या साथीने आज शैक्षणिक असे सिसिए ॲप त्यांनी तयार केलेले आहेत.

संजय गोरे हे सातारा जिल्ह्यातील परकंदी येथील एक प्राथमिक शिक्षक होय. शालेय कामकाज पाहता त्यांनी एक विचार केला की, जे कांहीं शिक्षकांची नित्याची कामे आहेत तिचं जर का भ्रमण ध्वनी अथवा संगणकावर हाताळता येत असतील तर शिक्षकांचे इतर कामकाजासाठी लागणारा वेळ वाचून अध्यापनात शिक्षक जास्तीचे झोकून घेऊन विद्यार्थ्यांत प्रगती घडवून आणतील.हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन श्री. गोरे यांनी आपल्याला अवगत असलेल्या संगणकाचे ज्ञान वापरून शालोपयोगी वेगवेगळ्या ॲप ची निर्मिती करायला सुरुवात केली आणि मागील दहा वर्षापासून गोरे यांनी बालवयात भरपूर जास्तीचे ज्ञान मिळावे म्हणून एक ॲप शिक्षकांसाठी तयार केले होते. त्याद्वारे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम व्यतिरिक्त जादा अभ्यास देऊन प्रत्येकाची ज्ञान पातळी वाढवण्यासाठी मदत झाली.त्यानंतर संजय गोरे यांनी सर्वात महत्वाचे ॲप बनवले ते म्हणजे शाळा स्तरावर प्रत्येकाला आवश्यक असे रेकॉर्ड एकच ॲप मध्ये.हे मात्र संगणकासाठी आहे. ज्यामध्ये शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा डाटा कायम संरक्षित राहील. यामध्ये प्रामुख्याने जनरल रजिस्टर तयार करणे, त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देणे, प्रवेश निर्गम उतारा तसेच बोनाफाईड प्रमाणपत्र ही देण्याची सुविधा उपलब्ध आहे.
              प्रधानमंत्री शालेय पोषण आहार योजना अंतर्गत ची कामे कशी किधण्य मागणी, शासनाने पुरवलेल्या धान्याची इतिंभूत माहिती ताळेबंद, इंधन व भाजीपाला खर्च मागणी आदी शाळा स्तरावर ठेवावयाची माहितीचे सुधा त्यांनी MDM नावाचे ॲप विकसित केलेले आहे.या ॲप मुले तर मुख्याध्यापकांचा डोक्यावरील बोजा कमी झालेला आहे.यानंतर २०१७ साली गोरे यांनी विद्यार्थ्यांचा निकाल पत्रकाचे ॲप बनवले असून राज्यभरातील कित्येक शिक्षक शिक्षिका याचा लाभ घेत आहेत. सध्याच्या खाजगी शाळेच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या तसेच खाजगी अनुदानित व विनअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या आनंदात भर टाकण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे गुणपत्रक, तसेच प्रमाणपत्रे आदी महत्वाचे कागदपत्रे तयार करण्यासाठीचे ॲप तयार केलेले आहेत.
         दरम्यान, राज्यभरातून त्यांच्या विविध ॲप ला शिक्षकांनी चांगलीच मागणी केली आहे. वास्तविक ह्या उपलब्ध ॲप ची किंमत नाममात्र अशी आकारली जाते. ज्या किंमतीत एका रजिस्टर ची किंमत मोजावी लागते.
शेअर करा
Exit mobile version