Site icon सक्रिय न्यूज

हभप अर्जुन महाराज लाड यांच्या गाडीचा अपघात…!

केज दि.११ – केज तालुक्यातील नामवंत किर्तनकार तथा व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने महाराजांना कसल्याही प्रकारची इजा झाली नसून ते सुखरूप आहेत.
           शनिवारी दुपारी केज ते अंबाजोगाई दरम्यान चंदन सावरगाव जवळ अर्जुन महाराज लाड यांची गाडी पलटी झाली. यामध्ये गाडी पुर्णतः क्षत्रिग्रस्त झाली आहे. सुदैवाने महाराजांना कसल्याही प्रकारची इजा झाली नसून ते सुखरूप आहेत.
            दरम्यान, अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version