केज दि.१९ – तालुक्यातील मौजे नायगांव येथे परिवर्तनवादी युगपुरुष जगतज्योती महात्मा बसवेश्वर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी राहुल खोडसे यांच्या पुढाकारातून महामानवांच्या संयुक्त जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करून आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो त्यामुळे रक्तदान करावे असे आवाहन स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी केले.
यावेळी राहुल खोडसे,प्रविण खोडसे, सुधाकर खोडसे, ऋषी देशमुख, ऋषि खोडसे, रोहन खोडसे, शार्दूल कुलकर्णी, भालगाव येथील अरविंद मोरे, आनेगावचे सरपंच अशोक गवळी, जयदीप इंगळे, राज खोडसे यांची उपस्थिती होती.