Site icon सक्रिय न्यूज

यावर्षीही बारावीच्या निकालात मुलींची बाजी…..!

यावर्षीही बारावीच्या निकालात मुलींची बाजी…..!

बीड दि.२१ – माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी – मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वा. ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. यावर्षी महाराष्ट्राचा 12 वीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. तर निकालात यंदा मागील वर्षी पेक्षा 2.12 टक्के वाढ झाली आहे.

                 महाराष्ट्राचा 12 वीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. तर एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांना परीक्षा दिली होती. 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलांची उत्तीर्ण टक्केवारी 91.60 अशी आहे. तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 95.44 अशी आहे. कोकणात सगळ्यात जास्त 97.91% निकाल तर मुंबईत सगळ्यात कमी 91.95% निकाल लागल्याचे समोर येत आहे.

             राज्यातील नऊ विभागीय मंडळातील निकाल
1. पुणे 94.44%
2. नागपूर 92.12%
3. छत्रपती संभाजीनगर 94.08%
4. मुंबई 91.95%
5. कोल्हापूर 94.24%
6. अमरावती 93.00%
7. नाशिक 94.71%
8. लातूर 92.36%
9. कोकण 97.51%
या परीक्षेस राज्यातील सर्व शाखांसाठी एकूण 14,33,371 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,23,970 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,29,684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व निकालाची टक्केवारी 93.37 आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना खालील संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल.
शेअर करा
Exit mobile version