Site icon सक्रिय न्यूज

आरटीई अंतर्गत मुदतीत अर्ज भरावेत….!

केज दि.२४ – सन २०२४-२५ या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पदधतीने दिनांक १७.०५.२०२४ पासून सुरु करण्यात आलेली आहे.
              आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेच्या कामकाजासाटी गठित केलेल्या पडताळणी समितीने प्रवेश पात्र बालकाचे प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असलयाने पडताळणी समितीस पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३१.०५.२०२४ असून पालकांनी मुदतीत अर्ज भरणे आवश्यक आहे.
             दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ प्रवेश प्रक्रीया जूनमध्ये सुरु होत असल्याने आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेस दिनांक ३१.०५.२०२४ नंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच ऑनलाईन प्रवेश अर्ज मुदतीपूर्वी भरण्याची काळजी घ्यावी असे आवाहन शरद गोसावी शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी केले आहे.
शेअर करा
Exit mobile version