Site icon सक्रिय न्यूज

दहावीच्या निकालाची तारीख ठरली…..!

बीड दि.२५ – गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावी रिझल्ट कधी डिक्लेअर होणार याची प्रतीक्षा होती. दरम्यान महाराष्ट्र राज्य बोर्डाने बारावी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर केल्यानंतर आता दहावीचा निकालही येत्या 27 तारखेला दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे.

                    राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहावीचा निकाल 27 मे 2024 ला जाहीर केला जाऊ शकतो अशी माहिती नुकत्याच काही दिवसांपूर्वी दिली होती. यामुळे येत्या दोन दिवसात दहावीचाही निकाल जाहीर होणार हे स्पष्ट होत आहे.

            दरम्यान, दहावीचा निकाल जाहीर होईल तेव्हा mahahsscboard.inmahresult.nic.insscresult.mkcl.org या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे.

शेअर करा
Exit mobile version