केज दि. 2 – तालुक्यातील चिंचोलीमाळी येथिल कर्मवीर विद्यालयाचा 10 वी वर्गाचा मार्च 2024 चा निकाल 97.77% लागला आहे.
एकूण 90 विद्यार्थ्यांपैकी विशेष प्रविण्यासह 68, प्रथम श्रेणी मध्ये 17, व द्वितीय श्रेणी मध्ये 3 असे एकूण 88 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर या शाळेतून केंद्रे शैलेश हनुमंत 93.60टक्के ( प्रथम ), गालफाडे आश्लेषा सतिष 92.60टक्के (द्वितीय ), बर्डे उत्कर्षा राजाभाऊ ,92.00 टक्के ( तृतीय ) आले आहेत .
सदरील गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार कर्मवीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनिल गलांडे, संचालक दगडू दळवे, चेअरमन अरुण काळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप गायकवाड, चंद्रकांत भुजबळ, राजाभाऊ नखाते, सुधाकर गायकवाड, आश्रुबा ढवळे, हनुमंत केंद्रे, सतीष गालफाडे, भारत बर्डे, मधुसूदन सपाटे, श्रीकांत वनवे, रामधन हंगे संतोष लोमटे, संभाजी सपाटे, महादेव गायकवाड, अभिमान भांगे, मुख्याध्यापक व्ही. बी. राऊत, पर्यवेक्षक जी. एम. राऊत तसेच सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.