केज दि. ३१ – तालुक्यातील साबला येथे “पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर” यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच दोन महिलांना पुरस्कार देऊन सन्मानी तही करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सरपंच जनाबाई नरहरी काकडे तर ग्रामविकास अधिकारी धनराज सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ” पुरस्कार सन 2023 – 2024 सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन आपला ग्रामपंचायत स्तरीय ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार ” श्रीमती कलावती हनुमंत नाईकनवरे, माजी सरपंच साबला व श्रीमती दैवशाला पांडुरंग काकडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या श्रीमती आशाबाई श्रीमंत काकडे, श्रीमती प्रतिभा पोपट काकडे, श्रीमती पार्वती महादेव नाईकनवरे, ज्ञानेश्वर श्रीकृष्ण पांचाळ, पवन राजेंद्र सरवदे उपसरपंच साबला, आदर्श शिक्षक नरहरी शहाजी काकडे , पोपट विश्वांभर काकडे, राहुल गुलाब मुळे, ईश्वर पांडुरंग काकडे, काशिनाथ गोवर्धन नाईकनवरे, अंकुश पांडुरंग काकडे, आश्रुबा जनार्धन नाईकनवरे, वसंत महादेव नाईकनवरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी धनराज सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन आदर्श शिक्षक नरहरी शहाजी काकडे यांनी केले.