Site icon सक्रिय न्यूज

प्रदीर्घ सेवेनंतर व्ही. डी. बनसोडे सेवानिवृत्त….!

केज दि. ३१ – तालुक्यातील कानडी माळी येथील रहिवासी मागच्या काही वर्षांपासून पुणे येथील सिंचन भवन येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेले  विठ्ठल दामोदर बनसोडे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. कार्यालयाच्या वतीने त्यांचा हृदय सत्कार करून निरोप देण्यात आला.
           विठ्ठल दामोदर बनसोडे मागच्या ३८ वर्षांपूर्वी पाटबंधारे खात्यात रुजू झाले होते. अनेक  वर्षे केज, अंबाजोगाई आणि फलटण येथे सेवा केल्यानंतर त्यांची बदली पुणे येथील सिंचन भवन येथे झाली होती. पुणे येथे त्यांच्याकडे खडकवासला पाटबंधारे विभागात मालमत्ता विभागाची जबाबदारी होती. तिथेही अगदी चोखपणे आपले कर्तव्य बजावल्यानंतर दि. ३१ मे रोजी ते सेवानिवृत्त झाले.
             दरम्यान सिंचन भवन कार्यालयात त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांचा हृदय सत्कार करून सेवेतून निरोप देण्यात आला. या प्रसंगी खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्यासह सर्व कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती.

            दरम्यान, मित्र सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचे वर्गमित्र सेवानिवृत्त पोलीसनिरीक्षक फुलचंद वाघमारे, मछिंद्र काशिनाथ सिरसाट तसेच सेवानिवृत्त फौजदार यू.एस. शिंदे यांनीही पुणे येथे सत्कार केला. 

शेअर करा
Exit mobile version