केज दि.19 – तालुक्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशा नुसार केज येथील व्यापारी वर्गाच्या अँटीजेन टेस्ट घेण्यात येत आहेत. या सर्व तपासण्या तीन केंद्र आणि एक फिरते पथक यांच्या माध्यमातून घेण्यात आल्या. दुपार पर्यंत सुमारे 748 तपासण्या पूर्ण झाल्या त्यात 17 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. त्यांना उपचारासाठी केज येथील कोरोना उपचार केंद्रात हलविण्यात आले आहे. केज येथील सररस्वती विद्यालय, वसंत महाविद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि एक फिरते पथक यांच्या मार्फत या तपासण्या झाल्या आहेत.