Site icon सक्रिय न्यूज

केज – कळंब रोडवर अपघात…!

केज – कळंब रोडवर अपघात…!

केज दि.८ – कळंब रोडवर चिंचोली फाट्यानजीक शनिवारी दि.8 रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान एक अपघात झाला असून व्हॅगनार गाडी रोडच्या खाली खड्ड्यात गेल्यामुळे तिघेजण जखमी झाले आहेत.

          केज कळंब रोडवर सायंकाळी सातच्या दरम्यान चार चाकी गाडी रोडच्या खाली जाऊन खड्ड्यात कोसळली. यामध्ये शरद गलांडे, अरुणा गलांडे आणि बाबुराव गलांडे (रा.केवड ता.केज) हे तिघे जखमी झाले आहेत.
                     दरम्यान सदरील अपघाताची माहिती मिळताच 108 चे पायलट मकरंद घुले आणि डॉक्टर ऋतुजा मोटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना केजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
शेअर करा
Exit mobile version