Site icon सक्रिय न्यूज

केज शहरातील चळवळीतील कार्यकर्त्याचे दुःखद निधन….!

केज दि.१५ – शहरातील चळवळीतील सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व तथा रिपाइंचे शहराध्यक्ष असलेले भास्कर मस्के यांचे न्यूमोनिया आजारावरील उपचारादरम्यान निधन झाले.चळवळीतील एका सच्चा कार्यकर्त्याचे अचानक जाण्याने चळवळीला एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ५५ वर्षे होते.
            भास्कर मस्के यांना मागच्या कांही दिवसांपूर्वी न्यूमोनिया झाला होता.त्यांच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरू होते.मात्र उपचारा दरम्यान त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला.भास्कर मस्के, हे केज शहरातील अत्यंत सामान्य, गरीब परिवारातील श्रीमंत आंबेडकरी विचारांचा कडवट कार्यकर्ता होता. शिक्षण कमी असले तरी चळवळीशी जोडलेला सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होतु. प्रत्येक सामाजिक प्रश्नावरील मोर्चे व केजच्या इतर आंदोलनात ते दिसायचे. गरज पडेल तेंव्हा स्वतःच्या उदर निर्वाहासाठी मजुरी करून आपला स्वाभिमान कायम ठेवणारा हा कार्यकर्ता होता.
          त्यांच्यावर शनिवारी दुपारी बारा वाजता भिमनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेअर करा
Exit mobile version