Site icon सक्रिय न्यूज

खा. रजनीताई पाटील यांच्यावर आता तीन राज्याची जबाबदारी…..!

खा. रजनीताई पाटील यांच्यावर आता तीन राज्याची जबाबदारी…..!
केज दि २० – काँग्रेसच्या खासदार तथा ज्येष्ठ नेत्या खा.रजनीताई अशोकराव पाटील यांच्यावर पक्षाने पुन्हा एक मोठी जबाबदारी दिली आहे. रजनीताई यांचेकडे आता तीन राज्यांची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाने प्रसिद्ध केलेल्या या यादीनुसार त्यांचेवर इतरांपेक्षा मोठी जबाबदारी असणाऱ्या त्या एकमेव नेत्या आहेत.
            गांधी घराण्याशी असलेली निष्ठा व पक्षातील एक विश्वासू नेत्या म्हणून नेहमीच त्यांच्यावर मोठी जबाबदारी पक्षाने सोपवलेली आहे. ताईंनी देखील तेवढ्याच जबाबदारीने पक्षाचे काम केलेले आहे. यावेळी त्यांच्याकडे  दिल्ली, उत्तराखंड व हिमाचल प्रदेश या तीन राज्याच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने त्यांच्यावर सर्वात मोठी जबाबदारी दिली असून तीन राज्याची जबाबदारी असलेल्या त्या एकमेव नेत्या आहेत. संसदपटू म्हणून राज्यसभा गाजवणाऱ्या व सरकारला धारेवर धरणाऱ्या काँग्रेसच्या प्रभावी महिला नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वीही ज्या राज्यांची जबाबदारी त्यांच्यावर दिली ती यशस्वीपणे पार पाडली आहे.
आजपर्यंत पक्षाने माझ्यावर दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या मी सक्षमपणे निभावल्या आहेत. आज पुन्हा काँग्रेस पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे. तीनही राज्यात सर्वत्र फिरून यावरती विचार मंथन केले जाईल व या राज्यात काँग्रेसला का पराभवाचा सामना करावा लागला याची उत्तर शोधून ती आम्ही पक्षाकडे व आमच्या नेतृत्वाकडे देऊ आणि निश्चितपणे आगामी काळात काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल यात शंका नाही. –
 रजनीताई पाटील (खासदार, राज्यसभा)
शेअर करा
Exit mobile version