केज दि.२७ – बुधवारी पहाटेच्या सुमारास केज मांजरसुंबा रोडवरील कोरेगाव पाटीवर भयानक अपघात झाला असून यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघे गंभीर जखमी झालेले आहेत.
राज्य रस्त्यावरील कोरेगाव फाट्या नजीक उभ्या असलेल्या ट्रकला कारची पाठीमागून जोरदार धडक बसली. यामध्ये कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरील कार ही आंध्र प्रदेश पासिंगची असून मृत्यू झालेल्या इसमांची व जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.
सदरील अपघाताची माहिती मिळताच 108 चे डॉक्टर सचिन सूर्यवंशी व पायलट अश्रुबा मुंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना केजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सदरील अपघात हा नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे.