Site icon सक्रिय न्यूज

डॉ.अंजली घाडगे निवडणूक लढवतील आणि निवडूनही येतील, कार्यकर्त्यांचा विश्वास……!

केज दि.२७ – लोकसभा निवडणुकांचा धुराळा कमी होताच आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. अवघ्या तीन ते चार महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. आपापल्या पक्षांकडून सध्या मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची चाचणी सुरू असून निवडणुकीची रणनीती ठरवण्याचेही काम वेगाने होत आहे. यामध्ये जुन्या चेहऱ्यांसह मोठ्या प्रमाणावर नवे चेहरेही निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झालेले आहेत.
               महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी येत्या तीन ते चार महिन्यांमध्ये निवडणुका होत आहेत. मागच्या पाच वर्षांमध्ये अनेक घडामोडी घडल्या आणि यामध्ये कित्येकांचे पक्षांतरही झाले. मात्र असे असले तरी जे काही विकासात्मक दृष्टी घेऊन आपला मतदारसंघ विकसित करण्याचे स्वप्न बाळगत आहेत त्यांना यावेळेस मतदार पसंती देतील असे दिसत आहे. केज विधानसभा मतदारसंघांमध्ये मागच्या कित्येक वर्षांपासून विकासाचा अनुशेष आश्वासने आणि केवळ भूलथापांनी भरला गेलेला आहे. ठोस अशा प्रकारचे कुठलेच शाश्वत काम केज विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेली नाही. निवडणुकी दरम्यान मोठ मोठी आश्वासने द्यायची, ऐनवेळी पक्षांतर करायचे आणि सत्ता मिळवायची एवढेच काय ते विधानसभेचे राजकारण दिसून येत आहे.
              मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केजच्या कन्या डॉ.. अंजली घाडगे यांनी एन्ट्री केली होती. त्या निवडणुकीत अगदीच नवख्या असल्या तरी मतदारसंघातील मतदारांनी मोठ्या प्रमाणावर त्यांना पाठिंबा दाखवला होता. डॉ. अंजली घाडगे ह्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचे भरीव योगदान आहे अशा रामराव घाडगे यांच्या कन्या आहेत. मागच्या दहा वर्षांपासून मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांनी संपर्क वाढवलेला असल्याने मतदारसंघातील बहुतांश गावामध्ये त्या पोहोचलेल्या आहेत. मतदार संघातील कित्येक स्थानिक लोकप्रतिनिधी डॉ. घाडगे यांच्या पाठीशी असून केजच्या आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहत आहेत. डॉ. घाडगे यांनीही सत्तेमध्ये नसताना सुद्धा कित्येक विकासात्मक कामे ही पुढे होऊन केलेली आहेत. आरोग्य, शैक्षणिक, पाण्याचे प्रश्न त्याचबरोबर महिलांच्या सक्षमीकरणावर त्यांनी या दहा वर्षांमध्ये विशेष लक्ष दिलेले आहे. विकासाची जाण असलेल्या डॉ. घाडगे यांनी मतदार संघाची चांगल्या प्रकारे ओळख करून घेतली असल्याने गावागावात त्यांचे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आहेत. लहानपणापासूनच सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या डॉ. घाडगे यांनी सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न स्वखर्चातून पूर्ण केलेले आहेत.                  दरम्यान केज विधानसभा मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आणि विशेषतः केज तालुक्याची जाण आणि कळकळ असणाऱ्या डॉ. अंजली घाडगे यांच्यासारख्या समाजशील उमेदवाराला मतदार पसंती देण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसून येत आहे. डॉक्टर घाडगे ह्या नेमक्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतात ? हे जरी त्यांनी अद्याप जाहीर केलेले नसले तरी अधिकृत पक्षाकडूनच त्या असतील आणि मोठ्या धडाडीने त्या विधानसभा लढवतील असे दिसून येत आहे.
शेअर करा
Exit mobile version