Site icon सक्रिय न्यूज

कोणत्या महिलांना मिळणार महिन्याला 1500 रुपये…..?

कोणत्या महिलांना मिळणार महिन्याला 1500 रुपये…..?

Oplus_0

मुंबई दि.१ – मागच्या दोन दिवसांपूर्वी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला.यामध्ये सर्वच स्तरातील नागरिकांसाठी अनेक घोषणा झाल्या.यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 घोषित करण्यात आली आहे.मात्र या योजनेत कोणत्या महिला पात्र आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
         सदरील योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. आणि याची अंमलबजावणी जुलै 2024 पासून होणार आहे.

पात्रता

महिलेचे वय 21 ते 60 वर्षे दरम्यान असावे. महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना मिळणार लाभ. उत्पन्नाची अट 2.50 लाखापर्यंत आहे. बँक खाते आवश्यक.

अपात्रता

घरात कोणी आयकरदाता असेल तर लाभ मिळणार नाही.
कुटुंबातील कोणी सरकारी नौकरीत असल्यास ही योजना लागू होणार नाही. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त असता कामा नये. नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर अर्ज करता येणार नाही. कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर पात्र ठरणार नाही. कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर (ट्रॅक्टर सोडून) तरीही लाभ मिळणार नाही.
         दरम्यान, एसटी बसेस मध्ये जसे महिलांना सरसकट अर्धे तिकीट काढून प्रवास करता येतो तसा या योजनेचा सरसकट लाभ मिळणार नाही.त्यामुळे पात्र महिलांनाच अर्ज करता येणार आहेत.
शेअर करा
Exit mobile version