Site icon सक्रिय न्यूज

मराठवाड्यात बुधवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे हादरे…..!

मराठवाड्यात बुधवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे हादरे…..!

Breaking news logo. Flat illustration of breaking news vector logo for web design

बुधवारी पहाटे मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि जिल्ह्याला भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. दोन्ही जिल्हे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरून गेले आहेत. हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्याला बुधवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. दोन्ही जिल्हे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरून गेले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद ४.२ इतकी करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
           मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीमध्ये (Hingoli Earthquake News) बुधवारी पहाटे साडेसात वाजेच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के बसले. ओंढा, हिंगोली, वसमतसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये भल्यापहाटे जमीन हादरली.अचानक कंपन होऊन घरातील भांड्यांची पडझड होऊ लागल्याने नागरिक चांगलेच धास्तावले. लोकांनी जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर धाव घेतली. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ इतकी नोंदवण्यात आली.
                       दुसरीकडे नांदेड (Nanded Earthquake News) जिल्ह्यालाही सकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नांदेडमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदु हा हिंगोली जिल्ह्यात असल्याचं कळतंय.
                    दरम्यान, परभणी जिल्ह्यामधील अनेक तालुक्यातही भल्यापहाटे ४.२ तीव्रतेचा भूकंपांचा धक्का (Parbhani Earthquake News) जाणवला. त्यामुळे सर्वत्र भीती पसरली आहे.
शेअर करा
Exit mobile version