Site icon सक्रिय न्यूज

उमरी शाळेत आषाढी एकादशी निमित्त वारकरी सोहळा….!

उमरी शाळेत आषाढी एकादशी निमित्त वारकरी सोहळा….!

Oplus_0

केज दि.१७ – “सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा” असा जयघोष करत उमरी येथील अशोकनगर येथील उमरी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वारकरी दिंडी काढली.
         आषाढी एकादशीनिमित्त शाळेत मंगळवारी दिंडी व पालखी सोहळा संप्पन्न झाला.आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे म्हणजेच भगवान विठ्ठल हे मूळचे पंढरपूरचे. पंढरपूर या शहरांमध्ये भगवान विठ्ठल यांचे एक भव्य मंदिर आहे.
त्या मंदिरामध्ये कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशीला लाखो विठ्ठल भक्तांचे गर्दी तुम्हाला बघायला मिळत असते.विठोबा यांना विठ्ठल आणि पांडुरंग या दोन नावाने ओळखले जाते. पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करीत यावेळी विठ्ठल रखुमाई सोपान, निवृति, तसेच विविध संत व वारकऱ्यांच्या विद्यार्थ्यांनी वेशभूषा साकारल्या. गीतगायन व अभंगगायन तसेच डोणगाव येथे रिंगण घालून विठ्ठल रुक्माई च्या मंदिरापुढे पाऊले खेळण्यात आली. गावकऱ्यांच्या वतीने अल्पोपहार,बिस्किटे चॉकलेट वाटून करण्यात आला.
          कार्यक्रम यशस्वी करण्याच्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती अडाने, शाळेतील विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री. ढालमारे  तसेच शाळेचे मुख्याध्यापक संदीप सत्वधर व श्रीमती डोंगरे, श्री. खामकर, ए. ए. रोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
शेअर करा
Exit mobile version