Site icon सक्रिय न्यूज

राजधानी दिल्लीतही 29% लोकांच्या शरीरात अँटिबॉडीज तयार…..

नवी दिल्ली | एकीकडे रुग्णणांची संख्या वाढत जात असली तरी दुसऱ्या बाजूला काही दिलासादायक बदलही दिसून येत आहेत. मध्यंतरी पुण्यातील लोकांच्या सर्वेत सुमारे 51% लोकांमध्ये कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अँटिबॉडीज तयार झाल्याचे दिसून आले होते. तर आता राजधानी दिल्लीतही 29% लोकांच्या शरीरात अँटिबॉडीज दिसून आल्याने ही दिलासादायक बाब आहे. दुसऱ्या सिरो सर्वेमधून ही माहिती समोर आली आहे.

दिल्लीतील 29.1 टक्के जनतेच्या शरीरात कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरात जास्त अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. 32.2 महिला तर 28.3 टक्के पुरुषांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. अँटी बॉडीज म्हणजे शरीरात कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होणं असा अर्थ सांगितला जातो.

शेअर करा
Exit mobile version