Site icon सक्रिय न्यूज

रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना ओवाळणी….!

रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना ओवाळणी….!

Oplus_131072

मुंबई दि.७ – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ कोटींपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाले असून या अर्जाचा ओघ अद्यापही कायम आहे. कारण, राज्य सरकारने १५ ऑगस्टची मुदत वाढवून आता ३१ ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहेत.
आता, लाडक्या बहिणीसाठी आणखी एक गुडन्यूज आली आहे. त्यानुसार, १७ ऑगस्ट
रोजीच या योजनेचा पहिला हफ्ता ३००० रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे, रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना ओवाळणी मिळणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.
            मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे १७ प्ट रोजी राज्य सरकारकडून Join दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरीत केले जाणार आहेत. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील. १७ ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार असल्याचीही माहिती आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे साठी पात्र झालेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version