Site icon सक्रिय न्यूज

माझ्या बाबत खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत….!

माझ्या बाबत खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत….!
संभाजीनगर दि.१० –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. सध्या ते छ. संभाजीनगरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले की, माझा आज दौरा संपला आहे. सोलापूरमधून दौऱ्याची सुरुवात झाली. मराठवाड्याच्या वातावरणाबाबत ऐकून होता. त्याचा स्वत: अनुभव घेतला. माझ्याबाबत खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या आहेत. राज ठाकरे हे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत असा खोटा प्रचार करण्यात येत आहे.
                       पुढे बोलताना राज ठाकरे पुन्हा म्हणाले की, माझं स्पष्ट म्हणणं आहे, महाराष्ट्रासारख्या राज्याला आरक्षणाची गरज नाही. कारण, राज्यात मुबलक सुविधा आहेत. आपल्याला पुरून उरेल इतकं आहे. तरी आपल्याला गरज निर्माण होते कारण बाहेरच्या लोकांना ह्या सुविधा मिळत आहेत. म्हणून आपल्या लोकांना कमी पडत आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. आरक्षण आर्थिक निकषांवर द्यायला हवं असं माझं स्पष्ट मत आहे. पण, सध्या जातीच्या आधारावर राजकारण केलं जात आहे. सध्याच्या दौऱ्याचा मनोज जरांगे पाटील यांच्याशी काहीच संबंध नाही. पण, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हा वाद निर्माण करत आहेत. या सर्वांमागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत. यामागे काही पत्रकार देखील आहेत, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.
शेअर करा
Exit mobile version