Site icon सक्रिय न्यूज

उमरी रोडवरील रहिवाशांना दिलासा…..!

उमरी रोडवरील रहिवाशांना दिलासा…..!

केज दि.२५ – शहरातील उमरी रस्त्याचे काम झाल्यानंतर अंतर्गत भागात जाण्यासाठी अॅप्रोचेस झालेले नव्हते. त्यामुळे रहिवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. सार्वजनिक बांधकाम केज आणि यश कन्स्ट्रक्शनच्या वतीने सदरील काम करण्यात आलेले आहे. मात्र रहिवाशांच्या पाठपुराव्यामुळे थोडेसे उशिरा का होईना यश कन्स्ट्रक्शन कंपनीने दखल घेतली, आणि रविवारी दोन एप्रोचेसचे उत्कृष्ट काम करून दिले.

           मागच्या काही महिन्यांपूर्वी उमरी रस्त्याचे मुख्य काम झालेले होते. परंतु दोन्ही बाजूला असलेल्या वसाहतीमध्ये जाण्यासाठी ऍप्रोचेस अर्धवट स्थितीत होते. त्यामुळे रहिवाशांना मुख्य रस्त्याला लागण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे सक्रिय न्यूज च्या माध्यमातून वेळोवेळी सदरील प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभाग केज आणि यश कन्स्ट्रक्शन च्या समोर आणण्यात आला. थोडासा विलंब झाला परंतु आता दोन गल्ल्याचे काम पूर्ण केले असून चालण्या वागण्या लायक झालेले आहे. कामही स्वतः यश कन्स्ट्रक्शन चे समाधान बाराते आणि करण कागणे यांनी थांबून चांगल्या पद्धतीने करून घेतल्याने सहयोग नगरी भागातील रहिवाशांनी यश कन्स्ट्रक्शनचे आभार मानले आहे.
                  दरम्यान सदरील प्रश्न प्रलंबित असल्याने वेळोवेळी संबंधित यंत्रणेच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला.मात्र आता काम झाल्याने रहिवासी समाधानी आहेत.
शेअर करा
Exit mobile version