Site icon सक्रिय न्यूज

कळंब पोलिसांनी तक्रारदारांना केले 28 मोबाईल सुपूर्द….!

कळंब पोलिसांनी तक्रारदारांना केले 28 मोबाईल सुपूर्द….!

Oplus_131072

कळंब दि.२५ – धाराशिव जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दि. 25 ऑगस्ट रोजी पोलीस ठाणे कळंब येथे भेटी दरम्यान पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेशी संवाद साधला. तसेच कळंब पोलीस ठाणे येथील पथकाने CEIR पोर्टल द्वारे विशेष अभियान राबवून पोलीस ठाणे कळंब हद्दीमधील नागरिकांचे हरवलेले व चोरीस गेलेले एकुण 28 मोबाईल पोर्टल द्वारे शोधून परत मिळवून पोलीस अधीक्षक  संजय जाधव यांचे हस्ते तक्रारदारांना परत केले.
            सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, श्री संजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी कळंब यांचे मार्गदर्शनाखाली कळंबचे पोलीस निरीक्षक रवी सानप, सपोनि श्री. हनुमंत कांबळे, पोलीस अंमलदार तारळकर, कदम, मोटेगावकर, खाडे यांचे पथकाने केली आहे.
              तसेच पोलीस निरीक्षक  रवी सानप यांनी कळंब पोलीस ठाणे परिसरामध्ये अटल आनंद घनवन योजने अंतर्गत एकुण 6,000 वृक्षांची लागवड केली आहे. ज्यामध्ये बऱ्याच दुर्मीळ रोपट्यांची लागवड केली असुन वृक्ष लागवड केलेल्या रोपट्यांना पाणी देण्यासाठी पाईपलाईनची सुविधा केली आहे. यासाठी विश्वास करे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनिकरण विभाग धाराशिव, शिरीष कुलकर्णी, वनपाल कळंब यांचे विशेष सहकार्य लाभले. सदरच्या अटल आनंद घनवन प्रकल्पाचे उदघाटन संजय जाधव, पोलीस अधीक्षक, धाराशिव यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस ठाणे कळंबचे पोलीस निरीक्षक  रवी सानप, सपोनि हनुमंत कांबळे, मसपोनि पुंडगे, सपोनि मगर, पोउपनि श्री. चाटे, पोउपनि पिलगंवाड यांच्यासह सर्व पोलीस अमंलदार उपस्थित होते.
शेअर करा
Exit mobile version