Site icon सक्रिय न्यूज

आणखी एक नवीन चेहरा केज विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत….!

आणखी एक नवीन चेहरा केज विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत….!
केज दि.२६ – विधानसभा मतदारसंघांमध्ये दिवसेंदिवस नवनवीन इच्छुक चेहऱ्यांची भर पडत आहे. यामध्ये शेवटपर्यंत किती जण तग धरतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र एक तरुण आणि सामाजिक प्रश्नांची जाण असलेला डॉक्टर केज विधानसभा मतदारसंघाच्या पटलावर आपले भाग्य आजमावण्याच्या तयारीत आहे.
                         अपवाद वगळता जनतेने नवीन चेहऱ्याला संधी दिलेली आहे. मात्र केज विधानसभा मतदारसंघाचा म्हणावा तेवढा विकास झालेला नाही. अनेक सामाजिक प्रश्न प्रलंबित आहेत. विधानसभा मतदारसंघांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल किंवा मग विजेचा प्रश्न असेल अद्याप पर्यंत तरी त्याची पूर्तता पूर्णपणे झालेली नाही. त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघांमध्ये विकासाची जाण असलेल्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणावर काम करण्याची संधी आहे. तसं पाहिलं तर मागच्या दोन ते तीन महिन्यांपासून केज विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक इच्छुक उमेदवार समोर येताना दिसत आहेत. आणि यात आणखी एका नव्या चेहऱ्याची भर पडली असून व्यवसायाने डॉक्टर असलेले राहुल शिंदे हेही केज विधानसभा मतदारसंघांमध्ये गाठीभेटी घेण्यावर भर देत आहेत.                                 तालुक्यातील राजेगाव येथील डॉक्टर राहुल शिंदे हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. सैनिकाच्या घरामध्ये अतिशय शिस्तीत वाढलेल्या राहुल शिंदे यांना सामाजिक प्रश्नाची जाण आहे. तसेच स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या तालमीमध्ये वाढलेले राहुल शिंदे हे बऱ्यापैकी विधानसभेमध्ये परिचित आहेत. मागच्या दोन महिन्यांपासून त्यांनी कित्येक गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांचे त्याचबरोबर तरुणांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभा मतदारसंघांमध्ये एमआयडीसी उभारण्यात यावी, त्याचबरोबर पाण्याचा, विजेचा आणि रस्त्याचा प्रश्न तात्काळ सुटावा यासाठी ते आग्रही आहेत. मतदारसंघातील बेरोजगार तरुणांना या माध्यमातून काम मिळेल या विचाराने ते एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर विधानसभा मतदारसंघांमध्ये आली पाहिजेत ही भूमिका मांडताना दिसत आहेत. विधानसभा मतदारसंघांमध्ये जे काही आरोग्यविषयक प्रश्न आहेत त्यासाठीही ते अगदी अल्प दरामध्ये आरोग्यविषयक अभियान राबवण्याच्या तयारीत असून खेड्यापाड्यातील रुग्णांना लाभ मिळावा यासाठी आरोग्याच्या योजना कार्यान्वित करण्याचा मनोदय ते व्यक्त करून दाखवत आहेत.
            दरम्यान, डॉक्टर राहुल शिंदे यांना सामाजिक प्रश्नांची जाण असल्याने व आपल्या वक्तृत्वातून मतदारांना प्रश्नांची उकल करत असल्याने दोन महिन्यातच मतदारसंघांमध्ये ते बऱ्यापैकी परिचित झालेले आहेत. सेवाभाव म्हणून राजकारणात येणार असल्याचे ते बोलून दाखवत असल्याने विधानसभा मतदारसंघांमध्ये ते मतदारांच्या किती गळी उतरतात ? हे कांही दिवसांतच दिसून येणार आहे.
शेअर करा
Exit mobile version