माजलगाव दि.२९ – खरीप हंगाम 2020 चा प्रलंबित पीकविमा तात्काळ वाटप झाला पाहिजे, खरीप 2023 व रब्बी 2023-24 चा पीकविमा सरसकट सर्वांना मिळाला पाहिजे, ई-पीक पहाणीची अट रद्द करून सोयाबीन, कापसाचे अनुदान सरसकट सर्वांना तात्काळ वाटप झाले पाहिजे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित किफायतशीर हमीभाव मिळाला पाहिजे या आणि इतर मागण्यासाठी होणाऱ्या रास्ता रोकोत सहभागी होण्याचे आवाहन नुमान अली चाऊस यांनी केले आहे.
तसेच जायकवाडी धरणाचे पाणी माजलगाव धरणात उजव्या कालव्याद्वारे सोडण्यात यावे, कापसाला दहा हजार आणि सोयाबीनला सात हजार हमीभाव मिळाला पाहिजे. शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ते झाले पाहिजेत, गुजरवाडी ते शेंडगे वस्ती व गुजरवाडी ते सातपुते वस्ती रस्त्याचे मजबुतीकरण झाले पाहिजे. शिंदेवाडी येथील पुलाचे काम तात्काळ चालु झाले पाहिजे, लहामेवाडी गावचा रस्ता चांगल्या दर्जाचा झाला पाहिजे, भगवान नगर रस्त्याचे काम तात्काळ चालु झाले पाहिजे.टालेवाडी येथील प्रलंबित 33 केव्ही सब स्टेशन झाले पाहिजे, राजेवाडी येथील कुंडलिका नदीवरील बंधारा तात्काळ दुरुस्त झाला पाहिजे व केंडे पिंपरी येथे नवीन बंधारा बांधला पाहिजे. पात्रुड गावचे गावठाणा फिडर तात्काळ चालु झाले पाहिजे, पात्रुड गावाचा लाईटचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला पाहिजे. या सर्व मागण्यांसाठी शुक्रवार दि. 30 आॅगस्ट 2024 रोजी माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील लोणगाव फाटा येथे सकाळी ठीक 10 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
तरी या आंदोलनात माजलगाव तालुक्यातील व पात्रुड परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष नुमान अली चाऊस यांच्यासह शेतकरी नेते भाई ऍड. नारायण गोले पाटील, बालासाहेब येवले, फजलू रहेमान पटेल, भाई मुंजा पांचाळ यांनी केले आहे.