केज दि.३ – महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहूजन कल्याण विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहीती तळागाळातील लाभार्थीपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन साने गुरुजी निवासी विद्यालयात करण्यात आले होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभाग बीड येथील निरीक्षक लक्ष्मण बारगजे यांनी विविध योजनांची माहीती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी श्री. बारगजे म्हणाले की, इतर मागास बहुजन कल्याण विभाग राज्यातील प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरीय मेळावे घेऊन या विभागा मार्फत राबविण्यात येणा-या विविध योजना ह्या समाजातील तळागाळापर्यंत लोकापर्यंत पोहचल्या पाहिजेत या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. या विमागा मार्फत १९५३ सालापासून निवासी आश्रमशाळा चालविण्यात येतात. या विभागामार्फत चालणा-या ऊसतोड प्रवर्गातील साने गुरुजी निवासी विद्यालय हे राज्यातील आय.एस.ओ. मानांकन मिळविणारी प्रथम निवासी शाळा आहे असेही ते म्हणाले. राज्यातील नामांकित इंग्रजी शाळात धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत व निवासी वसतीगृह चालल्या जाते. अशा अनेक योजनांची त्यांनी शासन राबवित असलेल्या योजनांची माहीती देतांना सांगीतले. महाज्योतीच्या माध्यमातुन विद्यार्थांच्या शिक्षणसाठी प्रशिक्षण व अर्थसहाय्य योजना, इतरमागासवर्गीय महामंडळामार्फत विविध कर्ज योजना तसेच श्यामराव पेजे कोकण इतरमागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, संत काशिबा गुरव यूवा आर्थिक विकास महामंडळ, जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज, केश शिल्पी आर्थिक विकास महामंडळ यासह ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलीसाठी वस्तीगृह, वि.जा.भ.ज.साठी आश्रमशाळा, धनगर समाजासाठी आवास व तांडावस्ती सुधार योजना आदी योजनांची साविस्तर माहीती दिली. प्रमुख अतिथी शिवाजी चाटे संस्थापक अध्यक्ष यांनीही आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. उद्धव कराड हे होते. तर व्यासपीठावर प्रा.कविता कराड, अजित चाटे, बाळासाहेब गाढवे, रामधन अशोक चाटे, गणेश कांदे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद शुक्ला, गोविंद देशपांडे, एन. एस. शेख, रामकीशन सोन्नार, श्री हातागळे, वैशाली सांगळे यांची उपस्थिती होती. श्रीमती शेख व त्यांच्या संस्कृतीक विभागाचा चमुने शब्दसुमनांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.