केज दि.४ – रोटरी तर्फे दरवर्षी दिले जाणारे आदर्श शिक्षकांसाठीचे ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ अर्थात ‘राष्ट्र उभारणी शिल्पकार अवॉर्डस 2024’ जाहीर झाले आहेत. केज तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात जिल्हा परिषद अंतर्गत सेवा देणाऱ्या दहा शिक्षक-शिक्षिकांना शिक्षकदिनी पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ केज चे विद्यमान अध्यक्ष प्रकाश कामाजी, सचिव अनंत तरकसबंद, प्रोजेक्ट चेअरमन हनुमंत भोसले, श्रीराम देशमुख, प्रा. डॉ बी.जे. हिरवे यांनी दिली आहे.
‘रोटरी इंटरनॅशनल’ ही एक जगातील सर्वात मोठी ‘जागतिक सामाजिक संस्था’ असून या संस्थेच्या पुरस्काराची सामाजिक व प्रशासकीय पातळीवर खूप मोठी प्रतिष्ठा आहे. या संस्थेचे पुरस्कारही योग्य व पात्र अशा व्यक्तीलाच दिले जातात.
वर्ष 2024 साठी केज तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षण सेवेअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक सेवा देणाऱ्या दहा शिक्षकांसाठीचे “नेशन बिल्डर अवॉर्ड” अर्थात ” राष्ट्र उभारणी शिल्पकार” पुरस्कार घोषित केले असून यामध्ये संदेश अंबादास फावडे, अशोक अनंतराव जोगदंड, मुल्ला समद बशीर साब, अनंत नानाभाऊ जाधवर, श्रीकृष्ण लक्ष्मणराव सिरसट, प्रशांत लक्ष्मणराव जाधव, गीता जीवराज अंडिल, वैशाली शंकरराव धाडवे, वैशाली कारभारी बोराडे, स्वाती वामनराव समुद्रे यांचा समावेश आहे.
दरम्यान, सदरील पुरस्कारांचे वितरण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर 24 रोजी सायंकाळी करण्यात येणार असल्याची माहिती केज रोटरीचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश कामाजी, सचिव अनंत तरकसबंद यांनी दिली आहे.