केज दि.५ – शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या डॉ. अंजली घाडगे यांच्या संकल्पनेतून गौरी गणपती सजावट आणि आरास करणाऱ्या महिलांसाठी स्पर्धा आयोजित केली आहे. उत्कृष्ट देखावे आणि सजावट करणाऱ्या महिलांना आकर्षक बक्षीस देवून त्यांना सारीकाताई सोनवणे यांच्या हस्ते बक्षीस देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
केज विधानसभा मतदार संघ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या नेत्या डॉ. अंजलीताई घाडगे यांनी केज शहरातील महिलांसाठी एक आगळी वेगळी स्पर्धा आयोजित केलेली आहे. येणाऱ्या गौरी-गणपतीच्या सणा निमित्त महिलांनी घरोघरी केलेल्या सजावटीची आणि देखाव्यांची केलेली आरास याची दखल घेत त्यांनी उत्कृष्ट आणि सामाजिक आशय व संदेश देणारे सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या सजावटीसाठी स्पर्धा आयोजित केली आहे. विजेत्या महिलांना सारीकाताई सोनवणे यांच्या हस्ते आकर्षक पारितोषिक देवून सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी महिलांनी दि. ११ सप्टेंबर पर्यंत राधाताई सकपाळ आणि शितल लांडगे यांच्याशी संपर्क साधावा.
दरम्यान, सदरील स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजक डॉ. अंजली घाडगे यांनी केले आहे.