केज दि.६ – चार दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यामध्ये बहुतांश भागांमध्ये पावसाने चांगले हजेरी लावल्याने लहान मोठ्या तलाव आणि धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढला आहे. मात्र चार दिवसांपासून थोडीशी पावसाने उसंत दिलेली होती. परंतु शुक्रवारी चारच्या दरम्यान पुन्हा पावसाने केस तालुक्यामध्ये जोरदार हजेरी लावली आणि तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये बराच वेळ वरून राजा बरसला.
सदरील पावसाने सखल भागामध्येही पाणी साचल्याने या पावसाचाही जे काही धरणं आणखीन भरायची राहिलेली आहेत त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. परंतु आता जे काढणीला पीकं आलेली आहेत त्याच्यामध्ये काही विघ्न येऊ नये अशी शेतकरी अपेक्षा व्यक्त करत आहे.
दरम्यान, पाऊस गरजेचा आहे त्याशिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सुटणार नाही. मोठे प्रकल्प आणि छोटे-मोठे तलाव हे आणखीही काही दमदार पाऊस झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे एकीकडे पाऊस तर पाहिजे परंतु पिकांचेही कांही नुकसान होऊ असा पेच निर्माण झाला आहे.