Site icon सक्रिय न्यूज

ड्रोन चा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा…..!

ड्रोन चा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा…..!

Oplus_131072

केज दि.१२ – मागच्या कित्येक महिन्यांपासून केज तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये रात्रीच्या सुमारास आकाशामध्ये ड्रोन घिरट्या घालत आहेत. आणि या ड्रोनमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची अक्षरशः झोप उडाली असून सदरील ड्रोन बाबत काहीच स्पष्टता होत नसल्याने लोक भयभीत झाले आहेत. त्यामुळे सदरील ड्रोन नेमके कुणाचे आहेत ? कोण फिरवत आहे ? हे स्पष्ट करून नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा आमरण उपोषण करावे लागेल असा इशारा रोहन गलांडे यांनी दिला आहे.

           केज तालुक्यामध्ये मागच्या काही महिन्यांपासून रात्रीच्या वेळेस आकाशामध्ये ड्रोन घेरट्या घालत आहेत. विशेषता सदरील ड्रोन हे ग्रामीण भागात दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आणि ड्रोन दिसल्यानंतर काही ठिकाणी चोऱ्याही झालेल्या आहेत त्यामुळे घिरट्या घालणाऱ्या ड्रोन चा आणि चोऱ्यांचा काही संबंध आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि याच संशयातून ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणावर भयभीत होऊन रात्र रात्र जागून काढत आहेत.
             त्यामुळे सदरील ड्रोन चा तात्काळ बंदोबस्त करावा आणि हे ड्रोन नेमके का फिरत आहेत हे स्पष्ट करावे अन्यथा आमरण उपोषणा शिवाय पर्याय नाही असा इशारा रोहन गलांडे यांनी केज तहसीलला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
शेअर करा
Exit mobile version