केज दि.१४ – महालक्ष्मीच्या सणासाठी मुळ गावी धारूरला आलेली महीला शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या दरम्यान केज बसस्थानकावरून छत्रपती संभाजीनगर बस मध्ये चढत आसताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख ४१ हजार रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शुक्रवारी केज बसस्थानकात घडली.
छत्रपती संभाजीनगर येथील घृष्णेश्वर सोसायटीत राहणा-या मयुरी स्वरुप कंकाळ या महालक्ष्मीच्या सणासाठी मुळगावी धारूरला आल्या होत्या. सण संपल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान त्या केज बसस्थानकावरुन छत्रपती संभाजीनगरला जाणा-या बसमध्ये चढत आणताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी छोट्या पर्सममध्ये ठेवलेले ५ तोळ्याचे सोन्याचे पट्टी गंठण, जुन्या वापरातील २ सोन्याच्या अंगठ्या व रोख २ हजार ७०० रुपये मिळुन एकुण १ लाख ४१ हजार ७०० रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. चक्क तहसीलदार च्या पत्नीचेच दागिने लंपास केल्याने सर्वसामान्य महिलांचे काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सदर प्रकरणी मयुरी स्वरुप कंकाळ यांच्या फिर्यादीवरून केज पोलीसात अज्ञात आरोपीविरुद्ध शुक्रवारी रात्री गुन्हा नोंद झाला असुन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक त्रिंबक सोपणे हे पुढील तपास करीत आहेत.