बीड दि.१५ – ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी दर्शवण्यात आलेली होती. परंतु मुस्लिम बांधवांना त्यांचा सण साजरा करण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि इतर कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडता यावेत यासाठी बीड जिल्हाधिकारी यांनी दिनांक 16 रोजी ची ईद-ए-मिलाद च्या सार्वजनिक सुट्टी मध्ये बदल करून आता ती बुधवार दिनांक 18 रोजी जाहीर केली आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यामध्ये आता ईद-ए-मिराची सुट्टी 16 ऐवजी 18 ला असणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी निर्गमित केले आहेत.