Site icon सक्रिय न्यूज

हवामान तज्ञ पंजाबराव डख म्हणतात, राज्यात तब्बल 11 दिवस पावसाचे….!

हवामान तज्ञ पंजाबराव डख म्हणतात, राज्यात तब्बल 11 दिवस पावसाचे….!

Rainy Day Bad WeatherRainy Day Bad WeatherRainy Weather

बीड दि.१६ – सध्या राज्यातील काही भागात पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र दिसून येत आहे. अशातच आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या 20 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रभरात कोरडं हवामान राहणार आहे. मात्र त्यानंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार आहे.
 हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात धो-धो पाऊस कोसळणार आहे.
                 तर राज्यातील नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर , पुणे, बीड या जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार आहे. 
          दरम्यान, राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहणार असल्यामुळे या भागातील नागरिकांनी अलर्ट राहावं असं आवाहन  पंजाबराव डख यांनी केलं आहे.
शेअर करा
Exit mobile version