छत्रपती संभाजीनगर, दि.१७ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्यावतीने ’महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’ संदर्भात येत्या शुक्रवारी (दि.२०) एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच विद्यापीठातील सर्व विभागप्रमुख सहभागी होणार आहेत. विद्यापीठाच्या नाटयगृहात शुक्रवारी (दि.२०) सकाळी १० ते ५ या दरम्यान कार्यशाळा होणार आहे. तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ विधिज्ञ, अभ्यासक अॅड.अर्जना गोंधळेकर व सामाजिक कार्यकर्त्या मंगला खिवंसरा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यशाळेच्या समन्वयक म्हणून डॉ.पुष्पा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाप्रमुख तसेच विद्यापीठातील विभागप्रमुखांनी कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर व उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.रणजितसिंग निंबाळकर यांनी केले आहे.