Site icon सक्रिय न्यूज

पितृपक्षाच्या कार्यक्रमात २३ जणांना विषबाधा….!

पितृपक्षाच्या कार्यक्रमात २३ जणांना विषबाधा….!

Bacteria and germs on vegetables and the health risk of ingesting contaminated green food including romaine lettuce as a produce safety concept 3D render elements.

केज दि.२१ – तालुक्यातील उंदरी या गावात पितृपक्षाच्या कार्यक्रमात अन्नातून २३ जणांना विषबाधा झाली. या सर्वांवर धारुर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. शशांक वाघमारे यांनी दिली.
              केज तालुक्यातील उंदरी येथे ठोंबरे परिवारात पितृपक्षाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या जेवणातून 23 जणांना विषबाधा झाली. तात्काळ बाधित रुग्णांना धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
          दरम्यान, वैद्यकीय अधिक्षक डॉ. शशांक वाघमारे यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. गोरख मोरे, डॉ. विजयकुमार सूळ, डॉ. परवेज शेख, डॉ. दत्तात्रय जाधव यांनी रुग्णांवर उपचार केले. सर्व विषबाधितांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. वाघमारे यांनी दिली.
शेअर करा
Exit mobile version