Site icon सक्रिय न्यूज

आठवीच्या वर्गात शिकणारा मुलगा बेपत्ता….!

आठवीच्या वर्गात शिकणारा मुलगा बेपत्ता….!

Oplus_131072

केज दि.२३ – तालुक्यातील सारणी (आ) येथील रहिवाशी असलेला विश्वजित ज्ञानेश्वर हांडे हा मुलगा इयत्ता ८ वी वर्गात शिक्षण घेत होता तो रविवारी तेलगाव हून परळी कडे जाताना हरवला आहे.
       सारणी (आ) येथील इयत्ता ८ वी वर्गात शिकणारा विश्वजित ज्ञानेश्वर हांडे हा विद्यार्थी परळी जवळ असलेल्या तपोवन येथे शिक्षण घेत आहे. रविवारी त्याच्या आजीने तेलगाव येथून परळी कडे जाणाऱ्या बस मध्ये त्याला बसवून दिले व शेजारी असणाऱ्या महिलेला सांगितले की तपोवन येथे त्याला उतरवा.
         सदरील विद्यार्थी दोन दिवसांनी जातो अस म्हणत होता. मात्र त्याची शाळा बुडेल म्हणून आजीने त्याला रविवारी पाठवून दिले. मात्र तपोवन या ठिकाणी तो विद्यार्थी पोहचलाच नाही. त्यामुळे त्याच्या पालकांनी गावाकडे, नातेवाईक यांच्या कडे चौकशी केली.परंतु तो कुठेही सापडला नाही. त्यामुळे त्याचा शोध सुरू असून हा विद्यार्थी कोणाला आढल्यास 9699394040 किंवा 9922662777 या क्रमांकावर कृपया संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शेअर करा
Exit mobile version