सध्या पितृपक्ष सुरू आहे. आपल्या पितरांना शांती मिळावी म्हणून पितृ पंधरवड्यात घरोघरी तर्पण, पितरे जेवायला घालणे यासारखे विधी पार पाडले जातात. पितरांना शांती मिळाली नाही, पितृदोष असेल तर प्रगति खुंटते, अनंत समस्या उभ्या राहतात अशी धारणा आहे. पितृदोषाने ग्रस्त लोक विविध तोडगे शोधण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात.
काँग्रेस पक्षाचे पोस्टर बॉय आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या तीन पिढ्यातील पूर्वजांनी अखंड, अनिर्बंध सत्ता उपभोगताना समाज आणि देशाच्या हिताला बाधक अशी अनेक राष्ट्रीय पातके केली आहेत आणि त्याचे फळ देश आजही काश्मीर प्रश्न, चीनबरोबरचा सीमावाद, सीमावर्ती राज्यांमधील वारंवार डोके वर काढणारा कॉंग्रेसच्या राजवटीत सातत्याने खालावत गेलेली देशाची आर्थिक व सामाजिक परिस्थिति, अनेक गुणवंतांची उपेक्षा केल्याने झालेला ब्रेन ड्रेन अशा विविध रूपात आजही भोगतो आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील समर्थ सरकार आणि राज्यातील मा. श्री देवेंद्र फडणवीस (आणि आता श्री एकनाथ शिंदे देखील) यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकार या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची, नवनवीन कायद्यांची आखणी आणि अंमलबजावणी करण्याचे अथक परिश्रम गेले दशकभार करत आहेत आणि त्याचे फळ म्हणून भारताला जगभर महासत्ता म्हणून तर महाराष्ट्राला भारताच्या प्रगतीचे ढळढळीत उदाहरण म्हणून मान्यता देखील मिळत आहे.
दुसर्याव बाजूला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस पक्ष मात्र त्यांच्याच पूर्वजांनी केलेल्या कर्मांचे फळ म्हणून झालेल्या त्याच्या राजकीय वाताहतीला सातत्याने तोंड देत टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहे. याला कॉंग्रेस पक्षाला आणि नेहरू गांधी परिवाराला भोगावा लागत असलेला एक प्रकारचा पितृदोषच म्हणावे लागेल. स्वत: राहुल गांधी यांनी देखील वेळोवेळी वेगवेगळ्या देशव्यापी यात्रांच्या नावाखाली “बेबीज डे आऊट” देखील साजरे केले. परंतु यातील कोणत्याही प्रयत्नांना यश येताना दिसून येत नाही. उलटपक्षी एकेकाळी देशावर एकहाती अनिर्बंध सत्ता मनमानी पद्धतीने गाजवणार्यात आणि आपल्याला विरोध करणार्या. वेगवेगळ्या राज्यांमधील प्रादेशिक पक्षांना खच्ची करून दिल्लीतून तुघलकी कारभार करणार्या कॉंग्रेस पक्षाला अधिकाधिक प्रमाणात प्रादेशिक पक्ष आणि कम्युनिस्टांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावे लागत आहे. एकेकाळी ज्यांनी सोनिया गांधींना विरोध करत कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि आपले स्वतंत्र प्रादेशिक पक्ष उभारले अशा महाराष्ट्रात शरद पवार, बंगालमध्ये ममता बॅनर्जी यासारख्या आणि ज्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व शीर्षस्थ नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत देशभर आंदोलन करुन राजकारणात पदार्पण करणार्याा अरविंद केजरीवाल संधीसाधू नेत्यांपुढे वारंवार लोटांगण घालण्याची नामुष्की कॉंग्रेसला सहन करावी लागत आहे.
कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर ही वेळ येण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी नेहरू-गांधी परिवारातील पूर्वासुरींच्या राष्ट्रीय पातकांचे परिमार्जन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न तर केलाच नाही, उलटपक्षी सत्तेच्या हव्यासापोटी राहुल गांधी आणि कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांनी सातत्याने भारताच्या विरोधात भूमिका घेऊन देखील लपतछपत शी जिनपिंग यांची भेट घेणे, गलवान खोर्या्त भारत-चीन यांच्यात तनाव असताना चीनी राजदूताबरोबर पुख्खा झोडणे, देशात आणि परदेशात ठिकठिकाणी जाऊन भारत विरोधी भूमिका घेणार्यार संदिग्ध लोकांच्या भेटीगाठी घेणे आणि सातत्याने देशहिताच्या व जनहिताच्या योजनांना विरोध करणे अशी नवनवीन पापे ते करत राहिले.
नेहरू-गांधी परिवारातील पूर्वासुरींची कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांना भोवत असलेली काही ठळक पातके:-
काश्मीर प्रश्न, अक्साई चीन प्रश्न
पंजाबमधील फुटीरतावाद, आणीबाणी
चीन-पाकिस्तानचे लांगूलचालन
निधर्मी सरकारच्या नावाखाली देशविरोधी भूमिका घेणाऱ्या अल्पसंख्य समुदायाचे तुष्टीकरण पुरोगामीत्वाच्या नावाखाली एका बाजूला जातीय ध्रुवीकरण करत असतानाच दुसऱ्या बाजूला दलित शोषित समाजाच्या हिताचा बळी देऊन त्यांना दाबून ठेवणे.