Site icon सक्रिय न्यूज

समितीचा विद्यार्थी, कर्मचाऱ्यांशी संवाद….!

समितीचा विद्यार्थी, कर्मचाऱ्यांशी संवाद….!
छत्रपती संभाजीनगर,दि.२४ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ’नॅक पिअर’ टिमने दुस-या दिवशी वसतिगृहांसह विविध केंद्राला भेट दिली. तसेच दुपारच्या सत्रात विद्यार्थी , संशोधक तसेच कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
            डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ चौथ्यांदा ’नॅक’ला समोरे जात आहे. राष्ट्रीय अधिस्वीकृती व अधिमान्यता परिषद (नॅक, बंगलोर) यांची ’पिअर टिम’ पुढील महिन्यात भेट देणार आहे. यासाठी विद्यापीठाने स्वयं मुल्यमापन अहवाल (एसएसआर) सादर केला आहे. ’नॅक’च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने सोमवारपासून (दि.२३ ते २५ सप्टेंबर) ’मॉक नॅक’ टिम भेटीसाठी आलेली आहे. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी, प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांच्यासह सर्व अधिष्ठाता, संवैधानिक अधिकारी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सदस्य, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे यांच्यासह आठ सदस्य आढावा घेत आहेत. या आठ जणांच्या अ, ब, क व ड असा चार उपसमित्या आहेत. यामध्ये प्रा.दिलीप धोंडगे, प्रा.ज्योती जाधव, प्रा.एम.ए.मोरे, प्रा.ई.बी.खेडकर, प्रा.भास्कर शेजवळ, प्रा.ए.एम.गुरव, प्रा.शिवाजी सरगर आदींचा समावेश आहे. समितीने पहिल्या दिवशी मुख्य परिसरातील ४२ विभागांना समितीने भेटी दिल्या. विभागप्रमुखांनी ’पीपीटी’ द्वारे सादरीकरण केले. दुस-या दिवशी एका समितीने विद्यापीठ धाराशिव उपपरिसराला भेट दिली. तर अन्य तीन समित्यांनी संशोधन केंद्र, वसतिगृहे, आरोग्य केंद्र, ग्रंथालय, इतिहास वस्तु संग्रहालय, क्रीडागंण, परीक्षा विभाग, अध्यासन केंद्र, अंतर्गत तक्रार समिती आदींना भेट दिली. तसेच संचालकांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला. दुपारच्या सत्रात विद्यापीठातील विद्यार्थी , संशोधक व माजी विद्यार्थी यांच्याशीही संवाद साधला. अखेरच्या सत्रात महात्मा फुुले सभागृहात विद्यापीठातील सर्व अधिका-यांशी संवाद साधला. यावेळी कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, वित्त व लेखाधिकारी सविता जंपावाड, सामान्य प्रशासन प्रमुख डॉ.कैलास पाथ्रीकर, डॉ. गणेश मंझा, डॉ. संजय कवडे आदींसह अधिकारी उपस्थित होते. विद्यापीठाच्यावतीने कर्मचा-यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी दिली. या विद्यापीठात कर्मचारी, विद्यार्थी कल्याणच्या दृष्टीने अनेक योजना उत्तम रीतीने राबविण्यात येत आहेत, याबद्दल समिती सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
शेअर करा
Exit mobile version