छत्रपती संभाजीनगर, दि.२५ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात माहिती अधिकार कायद्याचे अभ्यासक, राष्ट्रीय साधन व्यक्ती संदीप काळे यांचे येत्या शुक्रवारी (दि.२७) व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
’माहिती अधिकार दिन’ निमित्त महात्मा फुले सभागृह शुक्रवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल. मा.प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, वित्त व लेखाधिकारी सविता जंपावाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विद्यापीठातील शिक्षक व अधिकारी प्रवर्गातील ६५ जन माहिती अधिकारी कार्यशाळेस उपस्थित राहणार आहेत. सामान्य प्रशासन व जनसंपर्क विभागाच्यावतीने हा कार्यक्रम होत आहे. डॉ. कैलास पाथ्रीकर हे समन्वयक तर डॉ.संजय शिंदे हे सहसमन्वयक आहेत.