मुंबई दि २६ – अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं दोषी ठरवत संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद आणि 25 हजारांचा दंडही आकारण्यात आला आहे.
किरीट आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी 100 कोटींचा सार्वजनिक शौचालय घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याविरोधात मेधा सोमय्यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. रेकॉर्डवरील कागदपत्रं, चित्रफिती पाहता प्रथमदर्शनी संजय राऊत यांनी 15 आणि 16 एप्रिल रोजी मेधा सोमय्यां विरोधात संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचल्याचं न्यायालयाने सांगत कलम 499 नुसार शिक्षा स्पष्ट केली आहे.
दरम्यान, सदरील प्रकरणात संजय राऊत यांना अंशतः दिलासा मिळाला असून त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.