बीड दि.२९ –मागच्या काही महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषता ग्रामीण भागामध्ये रात्रीच्या वेळेस आकाशामध्ये ड्रोन फिरताना आढळून येत आहेत. आणि त्या ड्रोनमुळे ग्रामीण भागातील लोक भयभीत होत आहेत आणि या ड्रोनचा आणि घडणाऱ्या चोऱ्यांचा किंवा इतर काही गोष्टींचा संबंध जोडल्याने या ड्रोनची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. मात्र जरी मागच्या पंधरा दिवसापासून या ड्रोनची चर्चा कमी झाली असली तरी ड्रोन मात्र अधून मधून दिसत आहेत. परंतु या सर्व गोष्टींवर आता पडदा पडला असून सदरील ड्रोन हे दिल्लीमधील एका सप्तर्षी कंपनीचे असून केंद्र सरकारची काही माहिती एकत्रित करण्यासाठी घेऊन हे ड्रोन आकाशामध्ये ती एजन्सी सोडत आहे.
यामध्ये नेमकी काय माहिती गोळा केल्या जाते ? हे अद्याप जरी स्पष्ट झालं नसलं तरी छत्रपती संभाजीनगर भागामध्ये जे काही ड्रोन रात्रीच्या वेळेस घिरट्या घालत होते त्यासंबंधी आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनच पोलिसांना पत्र प्राप्त झाले असून सदरील ड्रोन हे परवानगी घेऊन सोडल्या जात असल्याचं स्पष्ट केल आहे.
दरम्यान हे ड्रोन जरी परवानगी घेऊन आकाशामध्ये सोडले जात असले तरी काही हौशी लोक विनापरवानगी ड्रोन आकाशामध्ये सोडतात. मात्र असे विनापरवाना ड्रोन जर आता आकाशामध्ये आढळून आले तर त्यावर कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सदरील ड्रोनमुळे कसल्याही प्रकारचे अद्याप कुणाचेही नुकसान झालेले नाही. आणि या ड्रोनला घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही असं स्पष्ट करण्यात आलं असल्याने आता ड्रोनबाबतची जी काही ग्रामीण भागामध्ये भीती पसरली होती ती कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे.