केज दि.१ – तालुक्यातील रहिवासी तथा राज्याच्या आरोग्य विभागातील नेहमीच चर्चेत असतील व्यक्तिमत्व डॉक्टर अशोक थोरात यांची पुन्हा एकदा बीडच्या शल्यचिकित्सक पदी निवड झाली आहे.
डॉक्टर अशोक थोरात हे स्वर्गीय विमल मुंदडा यांच्या कार्यकाळामध्ये आरोग्य विभागाचा कार्यभार सांभाळत होते. त्यानंतर त्यांनी केजचे उपजिल्हा रुग्णालय सुद्धा अवघ्या काही दिवसांमध्ये नावारूपाला आणले होते. त्यानंतर त्यांनी बीडला कोरोनाच्या काळात शल्य चिकित्सक म्हणून काम पाहिले. आणि त्यावेळी त्यांच्या कामाचे मोठे कौतुकही झाले होते. त्यानंतर डॉक्टर थोरात यांची नाशिक येथे बदली झाली आणि तिथून मुंबई येथेही त्यांनी काही दिवस काम पाहिले.
दरम्यान, आता पुन्हा एकदा बीडच्या शल्यचिकित्सक पदी त्यांची निवड झाली असून जिल्ह्यात पुन्हा एकदा त्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे.