केज दि.१ – शहरातील फुलेनगर येथे वास्तव्यास असणारे तथा नगरसेविका पदमीनबाई शिंदे यांचे चिरंजीव सुमेध शिंदे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 1 ऑक्टोबर रोजी घडली
केज नगरपंचायतच्या नगरसेविका पदमीनबाई शिंदे यांचे चिरंजीव सुमेध शिंदे हे बप्पा नावाने सर्व परिचित होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये ते सक्रिय होते.
दरम्यान, मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी दुपारी त्यांना राहत्या घरीच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आणि त्यानंतर त्यांना आंबेजोगाई येथे उपचारार्थ हलवण्यात आले होते. मात्र या हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.