मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. आज केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत मागणी सुरु होती. केंद्र सरकारच्या अख्यत्यारित ही बाब असते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा (Classical Language Status to Marathi) मिळाल्याने अनेक साहित्यिकांनी आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांकडून याबाबत सतत केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु होता. यामध्ये खासदार रजनीताई पाटील यांनीही सातत्याने संसदेत मागणी केली होती.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय (Ministry of Culture) या बाबत निर्णय घेत असतो. आतापर्यंत अनेक भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये याबाबत तरतूद करण्यात आली आहे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी हे निकष असतात…..!
* भाषेचे साहित्ये हे किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावे लागते.
* भाषेतील प्राचीन साहित्य मौल्यवान असावे.
* भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं लागतं ती इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
* भाषेचे स्वरुप इतर भाषेपासून वेगळे असावे.
अभिजात भाषेचा फायदा काय…?
* अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
* अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येते.
* अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.
दरम्यान, देशात तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. आता यामध्ये मराठी भाषेचा देखील समावेश करण्यात आला आहे.