बीड दि.५ – राज्यातून मॉन्सून माघारी फिरला असला तरी काही जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. पुढील काही दिवस राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील धुळे, जळगाव, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, जालना परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार कोकणामध्ये ठाणे व रायगडला 6 तारखेला तर रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये 5, 6 व 7 तारखेला तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात 7 तारखेला बऱ्याच जिल्ह्यात तर 8 तारखेला संपूर्ण विदर्भात वादळी वाऱ्यासह ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.